जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – सुमंत भांगे

मुंबई :- राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम,उपक्रम राबविण्यात यावेत तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका व नगरपालिका, नगर परिषद यांनी व्यापक प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करावे,असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिले आहेत.

राज्यात सर्व ठिकाणी १ ऑक्टोबर २०२३ हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्याबाबतचे परिपत्रक सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहे. या दिवशी सार्वजनिक पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबीर, चर्चासत्र, परिसंवाद इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजना विषयक बाबींची माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सचिव भांगे यांनी सांगितले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गादा गावातील जिल्हा क्रीडा संकुलाचे अर्धवट बांधकाम केव्हा पूर्णत्वास येणार - माजी जी प सदस्य अनिल निधान 

Fri Sep 29 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी :- ग्रामीण भागातील खेळाडूंना विविध राष्ट्रीय मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी व खेळाडूंच्या उज्वल भविष्याच्या चिंतेतून नागपूर जिल्ह्या हे तत्कालीन पालकमंत्री व नागपूर विधानपरिषदचे विद्यमान सदस्य चंद्रशेखर बवाबकुळे यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची संकल्पना मनात हेरून कामठी तालुक्यातील गादा गावाजवळच्या प्रशस्त जागेवर जिल्हा क्रीडा संकुल व फुटबॉल ग्राउंड बांधकामासाठी 29 मार्च 2016 ला 26 करोड रूपयाच्या मंजूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com