संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 29 :-कामठी तालुक्यातील वडोदा येथे नेहरु युवा केंद्र नागपूर युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय (भारत सरकार) व दिशा फाऊंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कामठी तर्फे तालुकास्तरीय खेळांचे आयोजन करण्यात आले.त्यामधे कामठी तालुक्यातील विविध गावातील दोनशे युवकांनी सहभाग नोंदविला..
यामध्ये १) 100 मीटर दौड २)बॅडमिंटन ३)गोळा फेक ४)रस्साखेच ५) कबड्डी या पाच खेळांचे आयोजन करण्यात आले.यामध्ये वय १५ ते २९ गटातील युवकांचा सहभाग होता.
बॅडमिंटन मध्ये प्रथम क्रमांक वेदांत साहारे (वडोदा) द्वितीय अजयकुमार मालवी (वडोदा) तृतीय आर्यन डहाट (कामठी) यांनी पटकाविला तर १०० मिटर दौड मुलीकरिता यामध्ये प्रथम क्रमांक कल्याणी बये (झरप) द्वितीय प्रियंका बावणे (सेलू) तर तृतीय शुभांगी ढोबळे (केसोरी) यांचा आला.तसेच गोळाफेक मध्ये प्रथम प्रज्वल घारपिंडे(भुगाव) द्वितीय अमित तिजारे (अंबाडी) तृतीय अन्शुल गगापारी (असालवाडा)कबड्डी मध्ये शिवनेरी क्लब वडोदा यांनी तर रस्सा-खेच मध्ये सेवन स्टार क्लब भुगाव यांनी बाजी मारली.
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या खेळाडूंना ट्रॉफी, सर्टिफिकेट व मेडल देण्यात आले..प्रत्येक सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले.
यामध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आलेल्या टीमला/खेळाडूला जिल्हा स्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आहे.
गायत्री बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक यशवंतराव वंजारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी उदयविर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच कार्यक्रमात सुग्रता वंजारी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य जी.एम सेलोकर यांनी युवकांना खेळांचे महत्व पटवून देत मार्गदर्शन केले. खेळांचे परीक्षक म्हणून कुणाल चरलेवार व रोशन हिवसे यांनी मोलाची भूमिका बजावली.कार्यक्रमाचे संचालन खोब्रागडे यांनी केले तर आभार वाघमारे यांनी मानले..
विविध खेळांचा आस्वाद घेण्यासाठी वडोदा येतील तसेच बाहेर गावातील युवक मोठ्या संख्येत उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय युवा कोर दीप्ती महल्ले व तनु गभने यांनी मेहनत घेतली..