नागपूर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओ.बी.सी विभाग, प्रदेश कार्यकारी अध्यक्षा यांच्या नेतृत्वातखाली आम जनता जनार्धनासाठी पूर्व नागपुरात भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात गरजू लोकांना ई-श्रम कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, मतदान कार्ड, आदीची निःशुल्क नोंदणी करून देण्यात येणार आहे. यामध्ये लवकरच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा देखील समावेश करण्यात येत आहे.
१५ जून पासून पूर्ण नागपुरातील प्रभाग २६ आणि २७ मध्ये १० शिविरांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच २५ जून रोजी प्रभाग ४ आणि २४ मध्ये २० शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते आणि पुढे देखील 15 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. पूर्व नागपुरातील उर्वरित प्रभागात देखील गरजू जनतेच्या सोयीसाठी अश्या प्रकारेचे शिविरांचे आयोजन संगीता तलमले यांच्या वतीने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन आणि सुमारे 12 हजारांच्या वर बेरोजगार युवकांनी भाग घेतला होता. महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी ओ.बी.मी विभागातर्फे पूर्व नागपुरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे कीट मोफत वाटप करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या सौ. संगीता तलमले यांनी आवाहन केले की या शिबिराचा अधिक लोकांनी लाभ घ्यावा. शिविराच्या यशस्वीसाठी कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.