यवतमाळ :- सुब्रोतो मुखर्जी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्लीच्यावतीने 63 व्या सबज्युनियर, ज्युनियर आंतरराष्ट्रीय सुब्रोतो कप फुटबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आयोजित जिल्हास्पर्धेसाठी खेळाडुंनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या अनुषंगाने राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात व विभागस्तर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे. जिल्हास्तर सबज्युनियर 15 वर्षाखालील मुले, ज्युनियर 17 वर्षाखालील मुले व मुली सुब्रोतो कप फुटबॉल क्रीडा स्पर्धा दि.12 जुलै रोजी सकाळी 8 वाजता नेहरु स्टेडियम, जिल्हा क्रीडा संकुल, यतवमाळ येथे होणार आहे.
संबंधित सहभागी होणारे संघा व त्यांच्या संघ व्यवस्थापक, मार्गदर्शकांनी या बाबीची नोंद घ्यावी. या अगोदर सुचविल्यानुसार www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडुंची नोंदणी करावी. स्पर्धेची अधिक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघांनी जिल्हास्तर स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले आहे.