संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी परिवहन विभागाकडून रस्ते सुरक्षा सप्ताह राबवण्यात येतो.या पार्श्वभूमीवर सेठ केसरीलम पोरवाल महाविद्यालय,कामठी येथे सोशल अवरणेस सेलद्वारा आयोजित वाहतूक सुरक्षा सप्ताह कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनय चव्हाण उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ सुधीर अग्रवाल तर मंचावर उपप्राचार्य डॉ मनीष चक्रवर्ती, उपप्राचार्य डॉ रेणू तिवाारी, प्रा डूडुरे , प्रा डॉ इंद्रजित बसू उपस्थित होते.या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना प्रा डॉ सुधीर अग्रवाल यांनी सध्या जगणं अवघड व मरणं सोपं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, किडय़ा मुंग्यांसारखी माणसं मारायला लागली आहेत. जीवाची किंमत कवडीमोल होत चालली असल्याने भीतीचे वातावरण निर्माण होत आहे, जणू जीवाची पर्वा कोणालाच नाही ! त्याचे महत्व काहीच शिल्लक नाही असे वाटायला लागले आहे. कारण आपण जीवाची किंमत वेळेला दिली आहे, आता माणसाच्या जीवापेक्षा, माणसाच्या शरीरापेक्षा वेळ अधिक मौल्यवान ठरत आहे. टीव्ही लावला, पेपर उघडला की अपघात झाल्याच्या बातम्या, सोशल मीडियावर तर न पहावणारे, मन हेलावणारे, काळजाचे ठोके वाढवणारे विचित्र अपघाताचे फोटो, व्हिडिओ आपण पाहतो. जीव कासावीस होतो, वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तसतसे अपघाताचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात वाढत आहे.म्हणून प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा डॉ सुधीर अग्रवाल यांनी केले.
अपघाताच्या घटना नित्याच्या बनत चालल्या आहेत. भरधाव वाहन चालविणे आणि वाहतुकीचे नियम न पाळणे या गोष्टी अपघाताचे मुख्य कारण बनत आहेत.वाहन चालवताना हेल्मेट घालणे, सीट बेल्ट लावणे,गतीवर नियंत्रण ठेवणे,नशा न करता वाहन चालविणे या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
वाहतूक सुरक्षेबाबत आपल्याकडे चांगले नियम आहेत; पण ते पाळले जात नाहीत हेच दुर्दैव आहे. वाहतूक सुरक्षा हा सुरक्षित जीवनाचा मार्ग आहे, त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी आता सर्वांनी आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे, असे मत, प्रा डॉ सुधीर अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनय चव्हाण यांनी वाहतूक सुरक्षा सप्ताहात वाहतुकीचे नियम काय, त्यांचे पालन कसे करावे, शहरातील वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी विद्यार्थी म्हणून आपली भूमिका काय, वाहतुकीची चिन्हे कोणती, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांची नोंदणी, तेथील वाहनांची तपासणी, किती वयापर्यंत कोणते वाहन चालवावे, वाहन चालविण्याचा परवानाअशी साद्यंत माहिती यानिमित्ताने उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभाप्रदर्शन प्रा.प्रियंका भोयर यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यात प्रा डॉ किशोर ढोले, प्रा डॉ असरार, डॉ इप्तिकार हुसेन यांनी सहकार्य केले