श्रमिक नगर येथे तृतीयपंथीयांसाठी विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन

पुणे :- भोसरी विधानसभा मतदार संघ आणि समाज कल्याण विभागाच्यावतीने श्रमिक नगर, तळवडे येथे तृतीयपंथी वर्गासाठी विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. मोहिमेअंतर्गत १८ नवमतदारांकडून नमुना क्र.६ चे अर्ज भरून घेण्यात आले.

नायब तहसिलदार अर्पणा देशपांडे यांनी नमुना क्रमांक ६, ७, व ८ चे अर्ज भरणे आणि त्यासोबत जोडण्यात येणाऱ्या कागदपत्राविषयी माहिती दिली. तसेच मुक्त व निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. तृतीयपंथी मतदारांना ईव्हीएम यंत्राबाबत माहिती व्हावी यासाठी मतदानयंत्र हाताळणीबाबत प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.

मोहिमेअंतर्गत एकूण ७३ नागरिकांनी मतदान प्रात्याक्षिकात सहभाग घेतला. १८ नागरिकांचे नमुना क्रमांक ६ व २ मतदारांचे नमुना क्रमांक ८ चे अर्ज भरून घेण्यात आले.यावेळी दिलीप करदुरे, सिओना साळवे आदी उपस्थित होते.

*अर्चना तांबे, स्वीप नोडल अधिकारी-* मतदार जागृतीसाठी विविध स्तरावर जनजागृती मोहिम आयोजित करण्यात येत आहे. अधिकाधिक तृतीयपंथीयांनी मतदारांनी मतदान नोंदणी करून मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा तसेच ईव्हीएम हाताळण्याविषयी प्रात्याक्षिकात सहभाग घ्यावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्ह्यातील गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम सुरू

Sun Feb 18 , 2024
पुणे :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्यावतीने पुणे जिल्ह्यातील शिवनेरी, सिंहगड, राजगड, तोरणा व इतर किल्ल्यावर व परिसरात १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सिंहगड किल्ला व परिसरातील स्वच्छता मोहिमेत २८५ किलो सुका कचरा (प्लास्टिक कचरा) संकलित केला असून पुणे महानगरपालिका कचरा प्रक्रिया प्रकल्पाकडे देण्यात आला. यामध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com