संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :--सफाई कर्मचाऱ्यांची मुलामुलींच्या शासाकीय निवासी शाळा नागपूर येथे शुक्रवार दि. ०६ डिसेंबर २०२२ रोजी ‘महापरिनिर्वाण दिन’ साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ हा कालावधी ‘समता पर्व’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आज ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यारपण करून अभिवादन करण्यात आले विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रस्तविकेचे वाचन केले.Dr. बाबासाहेब आंबेडकरांचे भारताच्या घटनेच्या निर्मिती मध्ये अमूल्य योगदान या बाबत विद्यार्थ्यानं डॉक्युमेंट्री दाखावण्यात आली.प्रत्येकाला संविधानाची माहिती असली पाहिजे, संविधान आहे म्हणूनच आपण सुरक्षित आहोत असे मनोगत प्रवीण कौंडळकर साह.शिक्षक यांनी केले शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल शंभरकर यांनी ” संविधान यांचे जीवनातील महत्व यावर प्रकाश घातला जीवनात संविधानचे किती व कसे महत्व आहे यावर आपले विचार मांडले. समता पर्व च्या निमित्ताने २६ nov ते 6 dec शाळे मध्ये विविध कार्यक्रम व प्रतियोगिता आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी मौन धारण करून महामानवाला अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रजनीकांत नंदनवार यांनी केले तर सूत्रसंचालन विशाखा गणोरकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रीती पाटील यांनी केले. कार्यक्रमांसाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.