संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय,कामठी येथे मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या पोस्टर स्पर्धेत बीएससी व एम एससीच्या एकूण ४१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या पोस्टर स्पर्धेचे परीक्षण डॉ.शालिनी चहांदे असोसिएट प्रोफेसर हेड डिपार्टमेंट ऑफ बायोकेमिस्ट्री, डॉ.जयश्री थावरे असोसिएट प्रोफेसर हेड डिपार्टमेंट ऑफ बॉटनी आणि डॉ. आलोक आर.राय असोसिएट प्रोफेसर हेड डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी यांनी केले.
या पोस्टर्स स्पर्धेत पदवी व पदव्युत्तर स्तरावर प्रत्येकी एका विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. पदवी स्तरावर बीएससी अंतिम वर्षातील प्रांजरल साखरे यांना प्रथम तर एमएससी अंतिम वर्षातील निकिता घाडगे आणि पृत्वा तडसे यांना पदव्युत्तर स्तरावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण व डॉ. संजीव पाटणकर, यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर अतिथी वक्ते डॉ. संजीव पाटणकर, नॅशनल कॉर्डिनेटर,मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, डॉ. विनय चव्हाण, प्राचार्य, सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज कामठी , डॉ. रतीराम चौधरी, रसायनशास्त्र विभागप्रमुख , डॉ. महेश जोगी, सूरज कोंबे, सहायक प्राध्यापक, मायक्रोबायोलॉजी विभाग हे उपस्थित होते.
अतिथी वक्त्याचा परिचय आभा मानापुरे, सहायक प्राध्यापिका, मायक्रोबायोलॉजी विभाग यांनी करून दिला. मायक्रोबायोलॉजीच्या “सुपर-मायक्रोबग्स” या विद्यार्थी संघटनेच्या नामांकित सर्व १४ सदस्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते एमएसआय सदस्यत्व प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थी युनिटचे अध्यक्ष मोहम्मद उझेर यांचाही सत्कार प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. विनय चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे अभिनंदन केले. उद्घाटन समारंभानंतर डॉ. संजीव पाटणकर, राष्ट्रीय समन्वयक, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांचे बायो-इनोव्हेशन आणि उद्योजकता या विषयावर अतिथी व्याख्यान झाले. या व्याख्यानात त्यांनी जैव-उद्योजकतेच्या विविध पैलूंची ओळख करून दिली. यशस्वी भारतीय जैव-उद्योजकांची विविध उदाहरणे दाखवून पुरेशे नियोजन आणि योजनांच्या अंमलबजावणीद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी प्रेरित केले.
अतिथी व्याख्यानानंतर आभार डॉ. नेहा देशेट्टीवार यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन अदिती पाटील,बी.एस्सी तृतीय वर्ष, मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थी युनिटच्या उपाध्यक्षा यांनी केले आणि त्यांनी आश्वासन दिले की विद्यार्थी वर्षभर विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करतील. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आलोक रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी डॉ.सुदीप मंडल, डॉ.विकास कामडी, डॉ.दिप्ती भाबरा, श्री.निशांत बुराडे, अलका सरोज, पांडे व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास शाम बारापात्रे व शैलेश रामटेके यांचे विशेष सहकार्य लाभले.