अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळ, विद्यापीठ रिसर्च अॅन्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन आणि एम.डी.बी. इलेक्ट्रोसॉफ्ट प्रा.लि. यांचे संयुक्त विद्यमाने ‘रोबोटिक्स’ विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 13 सप्टेंबर, 2023 रोजी अमरावतीकरीता नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळ येथे, दि. 16 सप्टेंबर रोजी यवतमाळकरीता जगदंबा अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ येथे, दि. 18 सप्टेंबर रोजी वाशिमकरीता आर.ए. कला, एम.के. वाणिज्य व एस.आर. राठी विज्ञान महाविद्यालय, वाशिम येथे, दि. 20 सप्टेंबर रोजी अकोलाकरीता श्रीमती मेहरबानु वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे, तर दि. 21 सप्टेंबर रोजी बुलढाणाकरीता माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिटूशन अंतर्गत अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, शेगांव येथे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयीन विद्याथ्र्यांकरीता तंत्रज्ञानाचे कौशल्य वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये विद्याथ्र्यांना रोबोटिक्सबाबत नाविन्यपूर्ण कल्पनांचे कौशल्य प्रदान करुन त्याचा उपयोग शेती, हेल्थकेअर, उद्योग व विविध क्षेत्रात कसा करता येईल तसेच त्या माध्यमातून विद्याथ्र्यांनी समाज सक्षमीकरण कसे करावे, आदींबाबत प्रात्याक्षिकांद्वारे सविस्तर मार्गदर्शन दिल्या जाणार आहे.
तरी जास्तीतजास्त विद्याथ्र्यांनी सदर प्रशिक्षण कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळाच्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता त्यांचेशी प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्र. 9404103800 यावर संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.