प्रहार मिलिटरी स्कूल मध्ये आंतर शालेय इको फ्रेंडली गणेश आयडल मेकिंग स्पर्धेचे आयोजन

नागपूर :- प्रहार मिलिटरी स्कूल व रोटरी क्लब एलिट नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी रोटरी क्लब एलिटच्या अध्यक्षा डॉ. सुषमा देशमुख व प्रहार मिलिटरी स्कूलच्या प्राचार्या वंदना कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

मान्यवरांनी भारत माता पूजन करून स्पर्धेचा शुभारंभ केला. निरनिराळया शाळांमधून अनेक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच त्यांनी त्यांच्या सृजनात्मक कौशल्याचा योग्य उपयोग करून कौशल्यपूर्ण प्रतिकृती साकारावी, या उद्देशाने दरवर्षी ही कार्यशाळा आयोजित करण्यात येते. दि.30 व 31 ऑगस्ट अशा दोन दिवस ही कार्यशाळा संपन्न झाली.

दि.2/09/2024 सप्टेंबर ला रोटरी क्लब एलिट व प्रहार मिलिट्री स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी रोटरी क्लब एलिटच्या अध्यक्षा डॉ. सुषमा देशमुख, प्रमोद मिसाळ एडमिन सचिव, शिल्पाली भालेराव प्रोजेक्ट सचिव व मार्गदर्शक तसेच परीक्षक म्हणून वैशाली कुंभारे, वैशाली कावरे उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांचे स्वागत प्रहार मिलिटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी यांनी रोप व स्मृतीचिन्ह देऊन केले. या स्पर्धेत एकूण 150 मुलांनी सहभाग दर्शवला. नागपुरातील 25 शाळांमधून विद्यार्थी सहभागी झाले होते.

गट अ’ मधून

१)प्रथम :- प्रतीक मेश्राम (सरस्वती विद्यालय)

२)द्वितीय क्रमांक:- देवश्री मेश्राम (भारती कृष्ण,विद्याविहार),

३)तृतीय क्रमांक :-आरुष राहुल

(बी आर.ए.मुंडले) प्राप्त केला.

उत्तेजनार्थ बक्षीस 

१)प्रथम क्रमांक:- वंश बावनकुळे (राजेंद्र हायस्कूल),

२)द्वितीय क्रमांक:- त्रिशा शेवरे (मुंडले स्कूल)

३)तृतीय क्रमांक :- इशिका भोंडे (कुर्वेज न्यू इंग्लिश स्कूल) या विद्यार्थ्यांनी पटकविले. तसेच

गट ‘ब’ मधून

१) प्रथम क्रमांक :-स्वरूप बांते (सोमलवार हायस्कूल)

२)द्वितीय क्रमांक ऋषिकेश डोंगरे (सरस्वती विद्यालय)

३)तृतीय क्रमांक रतनेश सपाटे (सोमलवार हायस्कूल)

उत्तेजनार्थ बक्षीस 

१)प्रथम क्रमांक:- चेतन कुबडे (सी.पी अँड बेरार रवी नगर),

२) देवांशू सावरकर (व्ही सोनी हायस्कूल),

३) दीपशिखा बुधावणे (बिशप कॉटन)

तसेच

‘गट क’ मधून

१)प्रथम क्रमांक मंथन लाऊटघरे (हडस हायस्कूल),

२)द्वितीय क्रमांक ज्वेल भगत (राही पब्लिक स्कूल)

३)तृतीय क्रमांक अविनाश ठाकुर (इरा इंटरनॅशनल स्कूल)

उत्तेजनार्थ बक्षीस 

१)प्रथम क्रमांक सुजल दरडे (प्रहार मिलिटरी स्कूल)

२)द्वितीय क्रमांक पियुष पटेल (सरोजनी हायस्कूल)

३)तृतीय क्रमांक प्रेम पटेल (भिडे गर्ल्स)

विशेष पारितोषिकासाठी क्रिएटिव्ह आयडिया म्हणून १) भावेश राऊत (हडस हायस्कूल) 

२) सर्वदा महाकालकर (रेडियन्स स्कूल),

३) रुद्र सहारे (सरस्वती विद्यालय) यांना पुरस्कृत करण्यात आले. पाहुण्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती शोमा पाल यांनी केले. याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक, पर्यवेक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप वंदेमातरम गीतगायनाने केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

क्षयरोग मुक्तीसाठी लसीकरणात सहकार्य करा - अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल

Tue Sep 3 , 2024
– बीसीजी लसीकरण सत्राला ४ सप्टेंबर पासून सुरुवात नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे केंद्र सरकाराचे क्षयमुक्त भारत अभियान राबविले जात आहे. त्याच अनुषंगाने ‘अडल्ट बीसीजी व्हॅक्सिनेशन कॅम्पेन’ याअंतर्गत मनपाच्या आरोग्य विभागातर्फे १८ वर्षावरील वयोगटातील वर्गासाठी बीसीजी लसीकरणाचे सत्र ४ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे. क्षयरोगमुक्तीकरीता जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com