नागपूर :-मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी ग्रुप सेंटर, CRPF नागपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये भारत सरकारच्या CISF, BSF, SSB, आसाम रायफल, NCC रेल्वे, भारतीय खाण ब्युरो, इन्कमटॅक्स, भौगोलिक सर्वेक्षण, एम्स, कॅनरा बँक, युको बँक, बॅक ऑफ बडोदा, ईएसआईसी, पोस्ट मध्ये निवडल्या गेले. यांसारख्या विविध कार्यालयांमध्ये एकूण 193 उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी सर्वचपोस्टने भाग घेतला होता. या कार्यक्रमात भारत सरकारच्या विविध विभागातील नोकरीसाठी ७१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आले. प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या ग्रुप सेंटरमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटचे बटण दाबून ऑनलाइन पाठवण्यात आली. त्यानंतर देशात 45 ठिकाणी आयोजित रोजगार मेळाव्यात सहभागी तरुणांना संबोधित करताना त्यांनी “कर्मयोगी प्ररंभ” मॉड्यूल लाँच केले. ज्याद्वारे नवनियुक्त कर्मचाऱ्यांना ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रमाची सुविधा मिळणार आहे. पंतप्रधानांच्या अभिभाषणानंतर कार्यक्रमाचे अतिथी रणदीप दत्ता, पीएमजी, पोलीस महानिरीक्षक, पश्चिम क्षेत्र, सीआरपीएफ, नवी मुंबई यांनी आपल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रदेऊन सुरुवात केली. त्यानंतर रोजगार मेळाव्यात उपस्थितीत इतर वरिष्ठ अधिकारी पी.आर.जांभोळकर, पोलीस उपमहानिरीक्षक, ग्रुप सेंटर, नागपूर, के.एम.बाली, मुख्यआयुक्त, प्राप्तिकर, शोभा मधले, पोस्ट मास्टर जनरल, ऋचा खरे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, विशाल साखरे, संचालक, G.S.I. यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. अशाप्रकारे या गट केंद्रातील 193 उमेदवारांना वैयक्तिकरित्या नियुक्तीपत्रे देण्यात आली. 22 ऑक्टोबर 2022 रोजी, धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “मेगा रिक्रूटमेंट ड्राइव्ह” लाँच करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.