संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- अविनाश हायस्कूल येथे स्पर्धा परीक्षा व सायबर क्राईम विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन जुनी कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांचे हस्ते दीप प्रज्वलन व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले.
यावेळी उपनिरीक्षक गीता रासकर,हेडकॉन्स्टेबल माया अमृत, शाळेचे संचालक पुष्पराज मेश्राम,किरण मेश्राम उपस्थित होते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात ठाणेदार दीपक भिताडे यांनी स्पर्धा परीक्षेचे प्रारूप, विविध विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून स्पर्धा परीक्षेत उत्तम संपादन करण्याचे आवाहन केले ,पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर यांनी सायबर क्राईम, मोबाईल फोन द्वारे ऑनलाईन होणारी फसवणूक ,अमली पदार्थाचे सेवन, हुंडाबळी विविध विषयावर मार्गदर्शन केले संचालन पुष्पराज मेश्राम यांनी केले व आभार प्रदर्शन किरण मेश्राम यांनी मानले मार्गदर्शन शिबिराला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.