नागपूर :-भारतीय जनता युवा मोर्चा अंतर्गत उद्योजक विकास मंच आयोजित अरुण लखानी ह्यांचा उद्बोधन पर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. यात प्रामुख्याने उपस्थित भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्याच्या महामंत्री शिवानी दाणी व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले ह्यांची उपस्थिती लाभली.
उद्योजक विकास मंचचे प्रमुख सुलभ देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात विश्र्वराज इंफ्रास्ट्रक्चर ली. चे एमडी. सीईओ अरुण लाखांनी यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले. ह्या निमित्ताने देशातले एक फार मोठे नाव, २४/७ या महत्त्वाकांक्षी पाणी पुरवठा योजनेचे जनक ह्यांचा नागपुरातील युवकांचा संपर्क आला उपस्थित उद्योजकांना यशस्वी उद्योजक बनण्याचे मूलमंत्र दिले आणि त्यांना अधिक ताकतीने व्यवसाय करण्यासाठी प्रेरित केले.
भारतीय जनता युवा मोर्चा अंतर्गत अश्या प्रकार चे उपक्रम हे नक्कीच तरुण उद्योजकांना प्रेरणादायी ठरतील. ह्या अतिशय चांगल्या उपक्रमासाठी सुलभ देशपांडे, उद्योजक विकास मंच व त्यांच्या संपूर्ण टीम चे अरुण लाखांनी यांनी अभिनंदन केले.