छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन

यवतमाळ :- कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर दि.21 जून रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे.

शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते होणार आहे. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून खासदार संजय देशमुख, आमदार मदन येरावार तसेच जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जी.यु.राजूरकर उपस्थित राहणार आहे.

शिबीरामध्ये प्रशिक्षणार्थ्यांचे व्यवसाय मार्गदर्शन, 10 वी, 12 वी नंतर पुढे काय, भविष्यातील रोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञानावर आधारीत प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी, पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमाची माहिती, पॉलिटेक्नीक, इंजिनिअरींग, कौशल्य विद्यापीठ अभ्यासक्रम, अल्पमुदतीचे अभ्यासक्रम, करीअर प्रदर्शनी, शैक्षणिक सुविधा मार्गदर्शन, व्यवसाय उभारणी इत्यादीबाबत डॉ.विवेक गंधेवार, डॉ.प्रशांत गावंडे, सरफराज अहमद सौदागर या विषयतज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराचा जिल्ह्यातील सर्व उमेदवार तसेच उमेदवारांच्या पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही.जे.नागोरे यांनी केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पांढरकवडा येथे 20 जून रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

Wed Jun 19 , 2024
यवतमाळ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.20 जून रोजी सकाळी 10 वाजता आयटीआय पांढरकवडा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्याकरीता स्वतंत्र मायक्रोफीन प्रायव्हेट लिमिटेड अमरावती, अन्नपुर्णा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, मुथुट मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळ, कैट एडुसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे, पियाजिओ व्हेईकल पुणे, आर्म्स […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com