केंद्रीय संचार ब्युरो नागपूर आणि जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या वतीने राष्ट्रीय पोषणमाह निमित्त मिनीमाता नगर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर :- ‘सुपोषित भारत, साक्षर भारत, सशक्त भारत’ बनवण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक घरा-घरात जाऊन हा संदेश पोहचवावा असे आवाहनन नागपूरच्या मिनी माता नगरच्या तथागत बुद्ध विहार येथे राष्ट्रीय पोषण माह निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात नागपूरच्या जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी केले. केंद्रीय संचार ब्यूरो, नागपूर आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागपूर शहर पूर्व, यांच्या संयुक्त विद्यमाने मिनीमाता नगर येथील आंगनवाडी केंद्र क्र. 54,तथागत बुद्धविहार येथे राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाप्रसंगी पाककले स्पर्धेसाठी आंगनवाडी सेविकांनी तयार केलेल्या पोषक आहाराचे निरीक्षण करण्यात आले. तसेच सुदृढ़ बालक स्पर्धाही घेण्यात आली. याप्रसंगी केंद्रीय संचार ब्यूरो नागपूरचे उपसंचालक शशिन् राय,यांनी ’हर घर संदेश पहुंचाऐंगें कुपोषण को दूर हटाऐंगें‘’ या संदेशाचे महत्त्व अधोरेखित करून आंगनवाडी सेविकांच्या कार्याची प्रशंसा केली.

यावेळी गर्भवती महिला, माता व बालकांनी आरोग्य सुदृढ बनविण्यासाठी कोणत्या आहाराचा समावेश करावा याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आंगनवाडी केंद्र क्र. 54 च्या आंगनवाडी सेविका व मदतनिस यांनी पथनाट्य सादर करून पोषण आहाराचे महत्व समजावून सांगितले. पाक कला स्पर्धा आणि सुदृढ बालक स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कारही करण्यात आला.

याप्रसंगी मंचावर सुपरवाइजर ज्योती रोहणकर तसेच रूपाली विडकर, अर्चना घरडे, आरोग्य सेवेच्या पोषाहार विभागाचे पोषाहार तज्ञ कल्पना बरडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना घरडे यांनी केले. संचालन वीणा बोरकर यांनी केले. तर आभार शारदा आकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रीय संचार ब्यूरोचे तांत्रिक सहायक संजय तिवारी, नरेश गच्छकायला, चंदू चड्डुके यांच्या सह आंगनवाडी केंद्रातील सर्व आंगनवाडी सेविका आणि मदतनिस यांनी परिश्रम घेतले. परिसरातील सर्व लाभार्थी या कार्यक्रमाला उपस्‍थित होत्‍या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भविष्यातील आव्हाने ओळखून तक्रारी आणि समस्यांचे निराकरण करा - दिलीप दोडके

Tue Sep 5 , 2023
नागपूर :- मानव संसाधन विभागातील अधिकार्‍यांनी भविष्यातील आव्हाने ओळखून, कर्मचार्‍यांच्या तक्रारी आणि संबंधित समस्यांचे नियोजित वेळेनुसार निराकरण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले. नागपूर परिमंडला अंतर्गत असलेल्या मानव संसाधन विभागातील सर्व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. आपले दैनंदिन काम नियोजित पद्धतीने करतांना कर्मचार्यांची उच्चपद श्रेणी, त्यांचे दावे आदी कामात कुठलाही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com