विधानभवन परिसरात 49 व्या पुष्पप्रदर्शानाचे आयोजन

नागपूर :- उपवने व उद्याने सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही 49 व्या पुष्पप्रदर्शनाचे आयोजन विधानभवन परिसर येथे दिनांक 25 व 26 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले आहे.

पुष्पप्रदर्शनात सहभाग घेण्यासाठी प्रवेश अर्ज बुधवार दिनांक 10 जानेवारी पासून शासकीय रोपवाटीका जुने सचिवालय परिसर सिव्हील लाईन नागपूर येथुन मिळणार. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जानेवारी असून विलंब शुल्कासह अंतिम अर्ज दिनांक 22 जानेवारी पर्यंत करता येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी ०७१२-२५६१४२५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपवने व उद्याने विभागाचे सहायक संचालक प्रसाद कडुलकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजप उत्तर मंडळतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Thu Jan 4 , 2024
नागपूर :- भारतीय जनता पार्टी उत्तर मंडळतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. भाजप उत्तर मंडलचे अध्यक्ष गणेश कानतोडे यांचे नेतृत्वात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी उत्तर मंडळचे पालक माजी आमदार गिरीश व्यास, शिवनाथ पांडे, महामंत्री राजेश हाथीबेड,संजय तरारे, राजेश बटवानी, अमित पांडे, गूरूमित बावरी,कमल मूलचंदानी, ओमप्रकाश इंगळे, रविन्द्र डोंगरे, रूनाल चव्हाण, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com