नागपूर :- नागपूर आर्य वैश्य समाज युवक सभेतर्फे रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी विधवा, विधुर, घटस्फोटीत, दिव्यांग, प्रौढ कुमार व कुमारिका यांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महाराष्ट्र तसेच लगतच्या राज्यातून 100 हून अधिक इच्छुक वधू-वरांनी भाग घेऊन परिचय दिला. प्रथम कन्यका मातेला हार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. नागपूर आर्य वैश्य समाज युवक सभेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव उपगन्लावार यांनी परिचय मेळावा सुरू झाल्याची घोषणा केली.
याप्रसंगी महाराष्ट्र आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष गणेश चक्करवार हे उपस्थित होते. लक्ष्मणराव उपगन्लावार यांनी आपल्या संक्षिप्त भाषणात आज या मेळाव्याची का बरं गरज आहे याबद्दल मार्गदर्शन केले व त्यानंतर वधू वरांनी परिचय देण्यास सुरुवात केली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन अभय अंजिकर व शुभांगी रथकंठीवार यांनी केले मंडळाच्या पुरुष व महिला सभासदांनी मध्यस्थी मंडळाचे कार्य करून वधू-वरांची एकमेकांशी भेट गाठ घडवून आणली.
शेवटी मंडळाचे सचिव अनिल तातावार यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली मेळावा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे विजय मारावार, विजय गगपल्लीवार, मंजुषा कोडगिरवार, अनिल तातावार, अरविंद वट्टमवार पांडुरंगपंत पाम्पट्टीवार, दत्तात्रय पोशट्टीवार, संजय गंगमवार, प्रफुल्ल चेपुरवार, प्रमोद वट्टमवार, संजय मारावार यांनी तसेच इतर महिला व पुरुष सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.