“महसूल सप्ताहानिमित्त”विविध कार्यक्रमांचे आयोजन

– नागरिकांनी महसूल सप्ताहाचा लाभ घ्यावा – विभागीय महसूलआयुक्त पी.वेलरासू

 नवीमुंबई :- महसूल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्ट हा “महसूल दिन” साजरा करण्याबरोबरच 1 ते 7 ऑगस्ट 2024 या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. या सात दिवसात कोकणातील प्रत्येक जिल्हयात शासनाने दिलेल्या सुचनांबरोबरच नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे आवाहन विभागीय महसूल आयुक्त पी.वेलरासू यांनी केले आहेत.

या सप्ताहात महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेत पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसूलीच्या नोटीसा पाठवणे, मोजणी करणे इत्यादी कामे वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आणि महसूल उद्दिष्ट पूर्ण करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी 1 ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन’ साजरा करण्यात येणार आहे.

1ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेच्या प्रचार व प्रसिध्दीने “महसूल दिन” आणि “महसूल सप्ताहाचा” शुभारंभ होणार आहे. 2 ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री युवा कार्या प्रशिक्षण” योजनेतर्गत जास्तीत जास्त युवकांना लाभ मिळवून देण्याकरीता अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रे तातडीने उपलब्ध व्हावीत यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. 3 ऑगस्ट रोजी सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन” योजनंतर्गत राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटी/दर्शनाच्या संधीचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, दाखले, प्रमाणपत्रे,तातडीने उपलब्ध व्हावीत यासाठी विशेष शिबारांचे आयोजन करण्यात येणार आहेत. 4 ऑगस्ट रोजी “स्वच्छ सुंदर माझं कार्यालय” ही विशेष मोहीम राबवून जिल्हा, तालुका, मंडळ व ग्रामस्तरावरील कार्यालय व परिसरातील स्वच्छता करण्यात येणार आहे. कार्यालयाचे अभिलेख व दस्तऐवज यांचे वर्गिकरण, व्यवस्थापन, संगणकीकरण यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी सीमेवर तैनात सैनिक तसेच शहिदांच्या कुटूंबीयांना मदत, त्यांना जमीन वाटप, संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन. 6 ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा दिव्यांगाचा कल्याणाचा” या उपक्रमातर्गत दिव्यांग व्यक्तींकरीता शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमाची माहिती तसेच या योजनांचा लाभ घेण्याकरीता आवश्यक असणाऱ्या महसूल विभागांशी संबधित विविध दाखले व प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विविध योजनांतर्गत दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या लाभांच्या अनुषंगाने जिल्हा, तालुकास्तरावर शिबीर आयोजित करुन स्वयंसेवी संस्थांच्यामदतीने उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे. 7 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील जिल्हयात कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबी निकाली काढण्यासाठी ‘महसूल संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महसूल सप्ताहा दरम्यान केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेण्यासाठी ‘महसूल सप्ताह सांगता समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमांचे नियोजन करून याबाबतची प्रचार व प्रसिद्धी करण्याबरोबरच महसूल विभाग, भूमी अभिलेख आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्यामार्फत शासकीय योजनांची माहिती विशद करणाऱ्या लघु चित्रफिती तयार करून विविध प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये हेल्पडेस्क, हेल्पलाईन तयार करून मदत करण्याकरिता यंत्रणा कक्ष करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आ. देवेंद्र भुयार यांचा दिल्ली येथे ठिय्या ! 

Fri Jul 26 , 2024
– बांगलादेश आयात शुल्क वाढीबाबत केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची भेट !  – बांगलादेश निर्यात शुल्काबात बैठक आयोजित करण्याची मागणी !  मोर्शी :- बांगलादेश सरकारने संत्रा फळांवर वाढवलेले आयात शुल्क पुनर्संचयित करण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत आमदार देवेंद्र भुयार यांनी थेट दिल्ली येथे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी भेट घेऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. विदर्भातील मुख्य फळ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com