यवतमाळ :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथे 17 वर्षाआतील मुले व मुली राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे दि.16 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे.
या स्पर्धेत राज्यातून अमरावती, नागपूर, पुणे, कोल्हापुर, नाशिक, मुंबई, लातुर व छत्रपती संभाजीनगर या आठ विभागातील विजयी संघ सहभागी होणार आहे. जिल्ह्यातील खेळाडू, शारीरिक शिक्षक, क्रीडा प्रेमी व नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होवून राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले आहे.