नागपूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व समता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कन्हान येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप पांडे, आय.सी.आय.सी ॲकेडमीच्या ज्योती, सतीश धुर्वे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे स्वयंसेवक आनंद मांजरखेडे, मुकुंद आडेवार यांची उपस्थिती होती.
विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप पांडे म्हणाले की,भारतीय संविधान हे सामाजिक न्याय आधारशिलेवर आधारित आहे. सामाजिक न्यायविभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या छात्रवास योजना, शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक सुविधा योजना व मोफत शिक्षणाच्या कायद्यामधील तरतूदी विषयी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे स्वयंसेवक आनंद मांजरखेडे यांनी गरजू व्यक्तींना मोफत सहाय्य व सल्लाविषयी माहिती दिली. आय.सी.आय.सी आय अॅकेडमीच्यावतीने तांत्रिक कौशल्याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी समता फाउंडेशनच्या वतीने नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा विधी सेवाप्राधिकरणाचे स्वयंसेवक आनंद मांजरखेडे यांनी केले तर आभार अर्जुन पात्रे यांनी मानले.