नागपूर :- प्रादेशिक मनोरुग्णालय व उडान प्रकल्प यांच्या सयुक्त विद्यमाने मानसिक रुग्णांकरिता आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये ६३ रुग्णांना आधारकार्डचे वाटप करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ.सतिश हुमने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आधार केंद्राचे व्यवस्थापक श्रीमान मराठे यांची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेकरिता डॉ.श्रीकांत करोडे, उडान प्रकल्पाचे प्रमुख डॉ.अभिषेक मामर्डे, व्यवस्थापक प्रवीण काकडे, अंकुश मांडरे यांनी प्रयत्न केले.