अवयवदान हे मानवी स्वभावाच्या नैतिकतेचे सर्वोच्च उदाहरण आहे- उपराष्ट्रपती

नवी दिल्ली :- उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज अवयवदानाचे सखोल महत्त्व अधोरेखित केले. अवयवदान म्हणजे एक आध्यात्मिक कृती आणि मानवी स्वभावाच्या नैतिकतेचे सर्वोच्च उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले. अवयवदान शारीरिक औदार्यापलीकडे जात असून करुणा आणि निःस्वार्थ वृत्तीची सखोल मूल्ये प्रतिबिंबित करते, असे ते म्हणाले.

Organ donation is highest moral exemplification of human nature!

कहीं न कहीं कुछ रुकावट है- जाने वाला देना चाहता है पर परिवार विचलित हो जाता है।

Time to overcome this mental block because #OrganDonation is a spiritual activity. @dadhichidehdan pic.twitter.com/gxxqZ5ImfM

— Vice-President of India (@VPIndia) August 18, 2024

जयपूरच्या जैन सोशल ग्रुप सेंट्रल संस्थान आणि दधिची देह दान समिती दिल्ली यांनी जयपूर इथे अवयवदात्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपराष्ट्रपतींनी नागरिकांना अवयवदानासाठी सामाजिक भान ठेवून प्रयत्न करण्याचे आणि मानवतेची सेवा करण्याच्या उदात्त परंपरेशी सुसंगत असलेल्या एका मोहिमेत याचे रुपांतर करण्याचे आवाहन केले.

अंगदान एक साधारण और सुलभ उपाय है: यह जितना बढ़ेगा, हमारे यहां लोग उतने ही सक्षम होंगे!

Medical fraternity will also rise and achieve greater expertise. @dadhichidehdan #OrganDonation pic.twitter.com/8Z76jTnaVr

— Vice-President of India (@VPIndia) August 18, 2024

जागतिक अवयवदान दिवसाची “ कोणाच्या चेहऱ्यावरील आजच्या स्मितहास्याचे कारण बना” ही संकल्पना अधोरेखित करत धनखड यांनी अवयवदानाच्या उदात्त कार्यासोबत वैयक्तिक आणि कौटुंबिक बांधिलकी निर्माण करण्याची प्रेरणा दिली.

इदम् शरीरम् परमार्थ साधनम्!

अर्थात, यह शरीर समाज के व्यापक लाभ के लिए एक साधन बन सकता है। #OrganDonation @dadhichidehdan pic.twitter.com/v0oAdfK6hb

— Vice-President of India (@VPIndia) August 18, 2024

अवयवदानाच्या वाढत्या बाजारीकरणाच्या विषाणूबाबत चिंता व्यक्त करत धनखड यांनी अवयवदान हे आर्थिक फायद्याचा विचार करून नव्हे तर समाजाचा विचार करून झाले पाहिजे, यावर भर दिला. वैद्यकीय व्यवसाय म्हणजे एक देवत्वाचा व्यवसाय असल्याचे सांगत आणि कोविड महामारीच्या काळात आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या निःस्वार्थ सेवेला अधोरेखित करत त्यांनी वैद्यकीय व्यवसायातील काही जण अवयवदानाच्या उदात्त स्वरुपाला कमकुवत करत असल्याचे नमूद केले. काही कावेबाज आणि धूर्त घटकांच्या व्यावसायिक फायद्यासाठी अवयवदानाचे क्षेत्र समाजातील असुरक्षित लोकांच्या शोषणाचे क्षेत्र बनू नये यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, असे त्यांनी सांगितले.

निःस्वार्थ सेवा आणि त्याग यांच्या अनेक उदाहरणांचे दाखले असलेल्या भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे महत्त्व सांगत त्यांनी प्रत्येकाला ज्ञान आणि मार्गदर्शनाचे भांडार म्हणून काम करत असलेले आपले प्राचीन ग्रंथ आणि वेद यातील विद्वत्तेचा अंगिकार करण्याचे आवाहन केले.

राजकीय मतभेद म्हणजे लोकशाहीचे वैशिष्टय असल्याचे महत्त्व अधोरेखित करत धनखड यांनी हे मतभेद कधीही राष्ट्रहिताला झाकोळून टाकणार नाही याची खबरदारी घेण्याकडे लक्ष वेधले. यापूर्वीच्या काळात आपल्या लोकशाहीला निर्माण झालेल्या धोक्यांबाबत, विशेषतः आणीबाणीबाबत युवा पिढीला शिक्षित करण्यावर आणि अशा घटना टाळण्यासाठी दक्ष राहण्यावर त्यांनी भर दिला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर एमपॉक्स परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने देखरेख

Mon Aug 19 , 2024
– पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा, यांनी भूषवले एमपॉक्स सज्जतेचा आढावा घेणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद – तात्काळ शोध लागण्यासाठी अधिक जास्त देखरेखीची केली सूचना – चाचणी प्रयोगशाळा पूर्णपणे सज्ज स्थितीत – या रोगाबाबत प्रतिबंधात्मक सार्वजनिक उपाययोजनांसंदर्भात जागरुकता अभियान हाती घेण्यात येणार नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी एमपॉक्स परिस्थितीवर सातत्याने देखरेख करत आहेत. पंतप्रधानांनी सूचना केल्यानुसार पंतप्रधानांचे प्रधान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com