गोराबाजार वस्तीच्या पुनर्वसनाचा गोराबाजारवासीयांचा विरोध

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- छावणी परिषद कामठी अंतर्गत येणाऱ्या गोराबाजार वस्तीचे पुनर्वसन वारेगाव करण्यात येत असून यासंदर्भात विशेष सभेचे आयोजन 9 ऑगस्ट ला आयोजन करण्यात आले आहे.गोराबाजार वासीयांनी या पुनर्वसनाचा तीव्र विरोध करण्यात येत असून आगामी 9 ऑगस्ट च्या सभेत गोराबाजार पुनर्वसनचा विषय हटविण्यात यावा या मागणीचे निवेदन समस्त गोराबाजार वासीयांच्या नेतृत्वात आज तहसीलदार अक्षय पोयाम यांना देण्यात आले.उल्लेखणीत आहे की यासंदर्भात गोराबाजार वस्ती चे पुनर्वसन करण्यात येऊ नये या मागणीसाठी माजी मंत्री व विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाणे,आमदार टेकचंद सावरकर यांना निवेदित करण्यात आले आहे.

याप्रसंगी गोपाल सीरिया, राहुल कनोजिया,प्रमेन्द्र वाही,देवा कनोजिया,सुरेंद्र भुटानी,युगचंद छल्लानी,अशोक राव,संजय कनोजिया,रितेश पाटील ,फिरोज अली,अफरोज शेख,दुर्गा खिचर,सुजित ठाकूर,शंभू खरकबाण,क्रिश मेहरोलिया आदी नागरिकगण मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्री सदाशिव पाटील शिक्षण संस्था कामठी ला स्वर्गीय इब्राहिम पठाण स्मृती पर्यावरण पुरस्काराने सन्मानित

Tue Aug 1 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- वनराई फाउंडेशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नागपूरच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा स्वर्गीय इब्राहिम पठाण स्मृती पर्यावरण पुरस्कार यावर्षी श्री सदाशिव पाटील शिक्षण संस्था कामठी यांना वृक्षारोपण व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरवण्यात आले धनवटे सभागृह नागपूर येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी यांच्या हस्ते सदाशिव पाटील शिक्षण संस्थेचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com