– महारेशीम जनजागृती अभियानाचा शुभारंभ
गडचिरोली :- टसर रेशीम शेतीतून हमखास उत्पन्न वाढीच्या मोठ्या संधी गडचिरोली जिल्ह्यात असून नागरिकांना टसर रेशीम शेतीचे फायदे सांगावे व त्यांना रेशीम उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिल्या.
Video Player
00:00
00:00
रेशीम शेतीची महत्व शेतकऱ्यांना माहिती व्हावे तसेच तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी पुढील एक महिना महारेशीम जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत टसर रेशीम शेती जनजागृती प्रचार रथाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हा रेशीम विकास अधिकारी सी.आर. वासनिक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.