रामटेक :- तालुक्याच्या आदिवासीबहुल भागातील गट ग्राम पंचायत पिपरिया अंतर्गत ग्राम पिपरिया येथे शनिवार दि. २७ मे रोजी आठवडी बाजाराचे शुभारंभ आमदार आशिष जयस्वाल तसेच पंचायत समीती सभापती संजय नेवारे यांचे हस्ते झाले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामवासी व भाजीपाला विक्रेते उपस्थित होते. पिपरिया व परीसरातील ग्रामवासीयांना जवळपास सात ते आठ कि.मी. अंतरावर असलेल्या पवनी येथील आठवडी बाजारात खरेदीसाठी जावे लागत होते. यात त्यांचा वेळ जायचा व इंधन खर्च सुद्धा येत होता. तेव्हा नेमकी हिच समस्या हेरुन ग्रामपंचायत पिपरियाचे सरपंच शेखर खंडाते व ग्रामविकास अधिकारी भारत वेट्टी तथा उपसरपंच व ग्रा.पं. सदस्यांनी आपल्याच गावात आठवडी बाजार भरवुन ही समस्या मार्गी लावण्याचे व नागरिकांना सुलभता निर्माण करण्याचे ठरविले होते. त्यानुसार नुकत्याच २७ मे ला पिपरिया गावात आठवडी बाजाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थितांमध्ये शांता कुमरे जि.प.सदस्य, चंद्रकांत कोडवते प. स.सदस्य, अशोक उईके, रामनाथ धुर्वे, इमारचंद भलावी सरपंच खानोरा, आकाश वासनिक सरपंच दाहोदा, शेखरकुमार खंडाते सरपंच ग्रा.पं. दाहोदा, भारत वेट्टी ग्राम विकास अधिकारी, संजय कोडापे, मूलचंद मर्सकोल्हे, ठाकरे सदस्य, विजय धुर्वे ग्रा सदस्य तसेच सर्व गावकरी आदी. उपस्थीत होते.