अरोली :- खात वरून जवळच असलेल्या पिंपळगाव /महालगाव नदीच्या काठावरील मैदानावर पिंपळगाव येथील जाणता राजा (आदर्श) क्रिकेट टीमच्या वतीने खास मकर संक्रात व जलसा निमित्य ओपन टेनिस थ्रो क्रिकेट टूर्नामेंट चे आयोजन उद्या 8 जानेवारी बुधवारपासून अंतिम सामन्यापर्यंत सुरू होणार आहे.
गावातील ,परिसरातील सामाजिक व राजकीय मंडळीकडून 15000 एक रुपयाच्या प्रथम पुरस्कार, दहा हजार एक रुपयाच्या द्वितीय पुरस्कार, 7001 रुपयाच्या तृतीय पुरस्कार त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर असेही पारितोषिके देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटनाला खासदार श्याम कुमार बर्वे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जि प सदस्य योगेश देशमुख, पिंपळगाव सरपंच निशा चाफले, उपसरपंच पपीता कांबळे, माजी सरपंच दुर्गा बुधे, पोलीस पाटील निखिल मेश्राम, मौदा तालुका भाजपा कार्याध्यक्ष मुकेश अग्रवाल, शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत भुरे, पंचायत समिती सदस्य दीपक गेडाम, तांडा सरपंच विनोद गभणे ,नरेंद्र मोहतुरे, राकेश बागडे, हिमांशू रोडे ,वैभव हटवार, भगवान बावनकुळे पोलीस पाटील खात रुपेश फंदी, कॉन्ट्रॅक्टर अरोली मेहर सह गाव व परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पुढारी व कार्यकर्ते गण उपस्थित राहणार असून या टूर्नामेंटच्या लाभ घेण्याचे आव्हान जाणता राजा (आदर्श) क्रिकेट टीमचे अध्यक्ष आशिष चाफले ,उपाध्यक्ष यश (चिंटू) सिंगनजुडे, सचिव मनोज मोहने, कर्णधार अनिश झडिये, उपकर्णधार पंकज मेश्राम सह समस्त पदाधिकारी गण व सदस्य गण यांनी केले आहे व टूर्नामेंटच्या यशस्वी साठी ते मागील आठ ते पंधरा दिवसांपूर्वीपासून ग्राउंड तयार करण्यासाठी परिश्रम घेताना पिंपळगाव – महालगाव – खात – तांडा या चौरस्त्यावरून दिसत असतात.