नागपूर :- उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2023-24 करिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
इच्छुक उमेदवारांनी https://foreignscholarship.2023.dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज 12 जुलै 2023 पर्यंत सादर करावेत. ऑनलाईल अर्जाची मूळ प्रत, प्रमाणपत्रे यांच्या सांक्षाकित प्रतिसह पडताळणीसाठी सहसंचालक विभागीय कार्यालय नागपूर येथे दिनांक 13 जुलै 2023 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यत सादर करावे, असे उच्च व शिक्षण विभागाचे सहसंचालक, डॉ.संजय ठाकरे यांनी केले आहे.