बसपच्या निळ्या झेंड्याखालीच ‘सर्वजन हिताय’शक्य -डॉ.हुलगेश चलवादी

– ‘जुड़ेंगे तो आगे बढेंगे, सुरक्षित रहेंगे’ची हमी

पुणे :- देशाला सामाजिक क्रांतीची आणि चळवळीची ओळख करवून देत दिशा दाखवणारे महामानव फुले-शाहु-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ‘बटेंगें तो कटेंगें’ अशी घोषणा देणे लोकनेत्यांना शोभत नाही. अठरा पगड जातींना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात; समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विचारधारेला स्थान नसल्याचे मत बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आणि वडगाव शेरीचे उमेदवार डॉ.हुलगेश चलवादी यांनी शनिवारी (ता.९) व्यक्त केले.

मायावती यांच्या ‘जुडेंगे तो आगे बढेंगे, सुरक्षित रहेंगे’ या घोषणेप्रमाणे सर्व समाजाने बसपाच्या पाठीशी उभ राहून समाजविघातक शक्तींना धडा शिकवण्याचे आवाहन यानिमित्ताने डॉ.चलवादी यांनी केले. येत्या १७ नोव्हेंबर रोजी येरवडा येथे देशाच्या ‘आयरन लेडी’ बहन मायावती ‘महासभेतून’ कलुषित विचारांच्या नेत्यांचा समाचार घेतील. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ हा विचार घेवून बसपची चळवळ अविरतपणे कार्यरत आहे. १००% विकासकारणाची संकल्पना मांडणाऱ्या बसपला त्यामुळे मतदारांनी कौल दिला तर येणाऱ्या काळात ‘फोडा आणि राज्य करा’ या विचारांच्या नेतृत्वाला तिलांजली दिली जाईल, असे देखील डॉ.चलवादी म्हणाले.

महायुती आणि महाविकास आघाडी वरकर्णी गोरगरिबांच्या पाठिशी असल्याचे दाखवत असले तरी दलित, मराठा, मुस्लिम, इतर मागासवर्गीयांसह सर्वसमाजाचे हित केवळ बसपाच्या विचारधारेत समाविष्ट असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले. शोषित, पीडित, उपेक्षित आणि गरिबांच्या न्याय हक्कासाठी बसपच एकमेव राजकीय पर्याय आहे. वडगाव शेरी मतदार संघातील मतदार सुज्ञ आहेत. त्यांच्यावर अशा समाजविघातक घोषणेचा प्रभाव पडणार नाही. पंरतु,परप्रांतीय नेत्यांनी पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नसल्याचे परखड मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले. दरम्यान वडगाव शेरीत घरोघरी जावून तसेच विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावून डॉ.चलवादी मतदारांसोबत संवाद साधत आहेत. ‘भैय्यांचे गॅरंटी’ त्यामुळे मतदार संघात चर्चेचा विषय ठरत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वंचितांचे अधिकार हिसकावून घेण्याचा काँग्रेस व इंडी आघाडीचा कट - नांदेड येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

Mon Nov 11 , 2024
नांदेड :- देशातील वंचितांची उपेक्षा ही काँग्रेस व आघाडीची जुनीच नीती असून वंचितांचे अधिकार हिसकावून या समाजाच्या जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा काँग्रेस आघाडीचा डाव आहे, असा थेट हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नांदेड येथील महायुतीच्या विशाल प्रचारसभेत बोलताना चढविला. महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीच्या या नीतीला थारा देऊ नका, महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचा वेग कायम रहावा यासाठी महायुतीलाच पुन्हा एकदा सत्ता द्या, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!