भारतीय लष्कराकडून भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

नवी दिल्ली :- भारतीय लष्कराने 13 फेब्रुवारी 24 ते 22 मार्च 24 या कालावधीत अग्निवीर आणि नियमित केडरच्या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील आणि दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील उमेदवार भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करू शकतात. संकेतस्थळाच्या JCO/OR/Agniveer नावनोंदणी विभागात हिंदी आणि इंग्रजीमध्ये व्हिडिओसह पात्रता, नोंदणी प्रक्रिया उपलब्ध आहे. अर्जदारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी वापरकर्ता अनुकूल चॅटबॉट देखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षेदरम्यान खेळाडू, एनसीसी प्रमाणपत्र धारक, आयटीआय आणि पदविका धारकांना अतिरिक्त गुण दिले जातील. ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षेत ऑफिस असिस्टंट/एसकेटी श्रेणीसाठी प्रथमच टंकलेखन चाचणी देखील सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात दलाल आणि फसवणूक करणाऱ्यांना बळी न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही शंका आणि स्पष्टीकरणासाठी, अर्जदार जवळच्या सैन्य भरती कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.

तरुणांसाठी राष्ट्रीय सुरक्षेसाठी योगदान देण्याची, मौल्यवान कौशल्ये विकसित करण्याची आणि शौर्य आणि अभिमानाचा वारसा असलेल्या प्रतिष्ठित संस्थेचा भाग होण्याची ही सुवर्णसंधी आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सूर्य घर मोफत वीज योजने’ ची केली घोषणा

Thu Feb 15 , 2024
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोफत विजेसाठी घराच्या छतावरील सौर योजना ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू करण्याची घोषणा केली. पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्‍यमावर पोस्ट केले:https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 ” शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी, आम्ही ‘ पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू करीत आहोत. 75,000 कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट दर महिना 300 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com