१२ वी व १०वी पुरवणी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध

नागपूर :- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) पुरवणी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र ४ जुलै २०२४ पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या संदर्भात तांत्रिक अडचणी उद्भवल्यास माध्यमिक शाळा तसेच कनिष्ट महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव शैलेंद्र पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ट महाविद्यालयांना जुलै-ऑगष्ट २०२४ च्या १०वी, १२वी परिक्षेची प्रवेशपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ४ जुलै २०२४ पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. School/College login मध्ये डाऊनलोड करण्याकरिता ही प्रवेशपत्र उपलब्ध झाली आहे. जुलै ऑगष्ट २०२४ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ट महाविद्यालयांनी १०वी, १२वी परिक्षेची प्रवेशपत्रे प्रिंट करुन घ्यावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.

ऑनालाईन प्रवेशपत्राची प्रिंट घेण्यास कोणतेही शुल्क पडणार नाही, या प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का व स्वाक्षरी घेता येणार आहे, विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळा, कनिष्ट महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढुन त्यावर द्वितीय प्रत असा शेरा द्यावा, फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का व स्वाक्षरी घ्यावे आदी सूचना मंडळातर्फे देण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NADP BAGS PRESTIGIOUS BW MERIT AWARDS 2024  IN EDUCATION CATEGORY FOR ITS PGDM COURSES

Fri Jul 5 , 2024
Nagpur :- National Academy of Defence Production (NADP) was honoured with the prestigious BW Merit Awards 2024 in the Education category for its exceptional PGDM Course at an event held at Delhi. Organized by BW Marketing World in association with BW Business world, the BW Merit Awards celebrate outstanding achievements and leaders in India’s marketing landscape. The inaugural edition of […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com