महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालयातील 5 वी व 8वी चे ऑनलाईन प्रवेश नोंदणी सुरू

नागपूर :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8वी साठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या व जानेवारी-2024 मध्ये होणाऱ्या मुल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज दिनांक 1 ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन नाव नोंदणी प्रवेश अर्ज http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर स्विकारण्यात येणार असून संकेतस्थळावर अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व आवश्यक कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये 2 ते 20 सप्टेंबर 2023 पर्यंत जमा करावे, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तृतीयपंथीयांच्या समस्याबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

Fri Sep 1 , 2023
भंडारा :- तृतीयपंथीय/ ट्रान्सजेंडर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून, या घटकास समाजाकडून सापत्न व भेदभावाची वागणूक दिली जाते. नेहमीच भेदभाव, सापत्न वागणुकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहिलेला आहे. त्यामुळे या समाज घटकांचे शासनामार्फत मुलभूत अधिकारांचे संरक्षण करुन त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिका-यांनी केले. तृतीयपंथीय समस्यांचे निराकरण करण्याकरीता सहायक आयुक्त ,समाजकल्याण विभाग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com