अमरदिप बडगे
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा बुजुर्ग येथील नागरीक तेंदुपत्ता संकलनासाठी मध्यप्रदेशातील जात असताना गाडीचा नियंत्रण सुटल्यने मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत १ मृत तर १४ नागरीक जखमी झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.
मृतकाचे नाव गणेश मारबदे वय ४२ वर्ष असुन तुमखेडा बुजुर्ग येथील रहिवासी असुन छगन धकाते वय 55 वर्ष व धिरज मारबदे वय ३८ वर्ष हे गंभीर जखमी आहेत .तर बाकी १२ मजुर किरकोळ जखमी आहेत.मृत झालेल्या गणेशच्या कुटुंबात पत्नी, मुलगी (१३ वर्ष) व मुलगा (१० वर्ष) आहे .तेदुपता संकलनासाठी मध्यप्रदेशातील गेले होते. टिकरी पोलिस स्टेशन जवळ अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.मात्र मृत झालेल्या गणेश कुटुंबावर कमावता व्यक्ती गेल्याने दुःखाचे डोंगर पसरले आहे. कुटुंबातील नागरिकांनी आथिर्क मदत मिळायला पाहिजे अशी मागणी प्रहार जनसक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेन्द्र भांडारकर यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.