नागपूर :- उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा 4 ऑगस्ट 2023 रोजी नागपूर येथे नियोजित दौरा आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रशासनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेवून यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.
उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव तसेच राष्ट्रीय कर अकादमीचा कार्यक्रम होणार आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत डॉ. इटनकर यांनी सूचना दिल्या.
बैठकीस महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, विमानतळ प्राधिकरण व इतर विभागाचे अधिकारी तसेच नागपूर विद्यापीठ व राष्ट्रीय कर अकादमीचे अधिकारी उपस्थित होते.