नागपूर :- युवक कॉग्रेसतर्फे सोमवारी (दि. 22) रोजी विजदर वाढीच्या विरोधात महाल विभाग व तुळशीबाग उपविभाग येथे आलेल्या मोर्चात सहभागी असलेल्या ग्रहाकांपैकी एकुण 17 ग्राहकांच्या विज बिलाबाबतच्या तक्रारींची दखल घेत त्या तक्रारींचे जागीच निवारण करण्यात आले आहे.
तक्रारकर्ता सर्व ग्राहकांची वीजबिले तुळशीबाग उपविभागामार्फत तपासून त्याची माहिती देखिल संबंधीत ग्राहकांना देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने रीडिंग अनुसार (फोटो प्रमाणे) बिल योग्य असल्याची माहिती या ग्राहकांना देण्यत आली. याशिवाय काही ग्राहकांनी मागील महिन्याचे बिल उशिरा भरल्याने चालू बिलात ते लागून आले असल्याचे स्पष्ट करुन देण्यात आले आहे.
सोबतच काही ग्राहकांच्या जुन्या थकबाकीचा समावेश चालू बिलात नियमानुसार लागून आले असून अश्या ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी यथयोग्य हप्ते देखील पाडुन देण्यात आले असून या ग्राहकांनी आपले वीजबिल नियमित भरण्याच्या सुचना देखील त्यांना यावेळी करण्यात आल्या. याशिवाय मोर्चात सहभागी असलेल्या 5 ग्राहकांच्या विनंतीनुसार त्यांचाकडील वीज मीटरची तपासणी आज कऱण्यात येणार असल्याचे महावितरनतर्फ़े कळविण्यत आले आहे.
यावेळी सर्व तक्रारदारांना विज बिल त्यांच्या वापरनुसार व रीडिंग अनुसारच दीण्यत आल्याचे त्यांना समजावून सांगण्यात आले असून कुठलेही अवाजवी बिल आकारण्यात आले नसल्याचे यावेळी या ग्राहकांना सांगण्यात आले आहे.
– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर