– बाईक रॅलीमध्ये वरिष्ठ अधिका-यांचे सारथ्य- 400 अंमलदारांचा सहभाग
– प्रोजेक्ट प्रयास (PRAYAS – Police Reaching out to youth and Students) अंतर्गत जिल्ह्यातील 101 आश्रम शाळेत 4 थ्या विर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धेची सुरुवात
– महिला सक्षमीकरणाकरिता भाजीपाला लागवड प्रशिक्षण, वृक्षारोपण, स्टुुडंन्ट पोलीस कॅडेटची शौर्य स्थळाला भेट
गडचिरोली :- आदिवासी म्हणजे सांस्कृतिक, भाषा, कला, साहित्याने श्रीमंत असणारा समाज होय या आदिम संस्कृतीचे जतन व्हावे याकरीता संयुक्त राष्ट्र संघाने सन- 1994 पासुन 09 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणुन घोषीत केले आहे. तेव्हा पासुन 09 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणुन साजरा केला जातो. तसेच ब्रिाटिश सत्तेच्या गुलामगीरीतुन देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता देशासाठी आहुती दिली अशा अमर हुतात्म्यांची आठवण व त्यांचे त्यागाची जाणीव राहावी याकरीता तसेच “ छोडो भारत ” आंदोलनाचा हा दिवस क्रांती दिन म्हणुन साजरा केला जातो.
त्याच पाश्र्वभुमीवर आज दि. 09 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमीत्य पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. तसेच पोलीस कवायत मैदान ते इंदिरा गांधी चौक पर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकुण 400 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला. बाईक रॅली समारोह शहिद पांडु आलाम सभागृह येथे पार पडला. विर बाबुराव शेडमाके व भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमेला पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पुष्पहार अर्पण कुरुन उपस्थितीत पोलीस अधिकारी/अंमलदार यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. व आझादी का अमृत महोत्सव निमित्त “ मेरी माटी मेरा देश ” या उपक्रमाअंतर्गत पोलीस अधिकारी/अंमलदार यांना पंचप्रण शपथ देण्यात आली. प्रोजेक्ट प्रयास अंतर्गत सामान्य ज्ञान परीक्षेचा शुभारंभ शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा नवेगाव येथे पार पडला. यामध्ये जिल्ह्रातील 101 आश्रमशाळेमध्ये प्रोजेक्ट प्रयासचा 4 था टप्पा सुरु करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थितीत होते. स्टुडंन्ट पोलीस कॅडेट च्या 50 विद्यार्थी-विद्यार्थीनींनी पोलीस मुख्यालय येथील शौर्य स्थळास भेट दिली असता त्यांना शौर्य स्थळाबद्दल माहिती सांगण्यात आली. व प्रत्यक्ष हेलिकॉप्टरची पाहणी करुन त्याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक यांनी विद्यार्थासोबत संवाद साधला.
पोलीस मुख्यालय येथील एकलव्य हॉल मध्ये कृषी समृध्दी योजने अंतर्गत जिल्हयातील दुर्गम भागातील महिला बचत गट सक्षमीकरण करणे करीता “भाजीपाला लागवड प्रशिक्षण” आयोजीत करण्यात आले यामध्ये 26 महिला बचत गटाच्या 260 महिला सदस्यांनी सहभाग नोंदविला. बचत गटातील महिला शेतकयांना स्प्रे पंप, कृषी खत , व सिताफळची रोपे वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात कुमारी श्वेता कोवे, रा. कढोली हिची 10 मिटर पिस्टल पॅरा टुरनामेंट करीता निवड झाल्याने व सौरभ सुखदेव जिलेपल्लीवार याची एनपीसीआयएल, कैगा-कर्नाटक येथे वैज्ञानिक म्हणुन निवड झाल्याने त्याचे आई-वडीलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे व कृषी विज्ञान केंद्राचे पदाधिकारी उपस्थित होते.
जागतिक आदिवासी दिनानिमीत्त गडचिरोली जिल्हयातील संपुर्ण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय स्तरावर व पोस्टे,उपपोस्टे व पोमके स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आज “RUN FOR TRIBAL” मॅराथॉन, रक्तदान शिबीर, जनजागरण मेळावे, विविध स्पर्धा, रॅली, रेलानृत्य स्पर्धा , वाचनालय उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले. प्रोजेक्ट उत्थान अंतर्गत महिला सक्षमीकरण करण्याकरीता नारगुंडा येथे स्वयंरोजगार केंद्र सुरु करण्यात आले. सुन यामध्ये स्थानिक महिलांना शिलाई प्रशिक्षण सुरु करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलाने दुर्गम – अतिदुर्गम भागातील आदिवासी लोकांचे समस्या सोडविण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्याकरीता सन 2021 पासुन पोलीस दादोलोरा खिडकीची स्थापना करण्यात आली असुन माहे जुलै 2023 पर्यंत विविध शासकीय योजनांचे एकुण 4,59,277 लाभाथ्र्यांना लाभ पोहचविण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले.
यावेळी सदर कार्यक्रमास पोलीस अधीक्षक नीलोत्पल , अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच प्रभारी अधिकारी नागरी कृती शाखा पोउपनि धनंजय पाटील व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.