संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- परमात्मा एक दानपट्टा व मर्दानी आखाडा निमखेडा व राजे शिवकालीन शास्त्रविद्या आखाडा टेकाडी व्दारे विजयादशमी निमित्त आखाड्यातील शस्त्राचे पुजन करून शस्त्र चालविण्याचे मनमोहक प्रात्याक्षिक सादर करून उपस्थितांचे मने जिकंली.
सर्वप्रथम वस्ताद मोहन वकलकर यांच्या मार्गदर्शनात परमात्मा एक दानपट्टा व मर्दानी आखाडा निमखेडा व राजे शिवकालीन शास्त्रविद्या आखाडा टेकाडीव्दारे विजयादशमी निमित्त टेकाडी गावात आखाड्यातील दांडपट्टाचे व शस्त्राचे विधीवत पुजन करण्यात आले. राज्यस्तरीय १७ वी आष्टी दिवस स्पर्धमध्ये शिवगल्लीत प्राविण्य मिळवलेल्या आखाडा नऊ शिक्षक व विद्यार्थ्यांनी शिवकलेचे सुंदर मनमोहक प्रात्यक्षिक सादर करित सर्व उपस्थितांचे मने जिंकली . या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मोहन कवडु वकलकर (वस्ताद) निलेश गाढवे, छकुली वासाडे, अविनाश वकलकर, सुरज इंगोले, निखिल वकलकर, रामु सातपैसे, अंतेश्वर वकलकर, अनिकेत निमजे, मनोहर सातपैसे, प्रविण इंगोले आदीने महत्वाची कामगिरी बजावली. कार्यक्रमास बहु संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.