संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील दोन महीन्यांपासून मणिपूर येथे हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.या सर्व घटना दरम्यान दोन महिलांवर अत्याचार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.त्या घटनेच्या पाश्वरभूमीवर कामठी महिला संघातील समस्त महिलानी काळ्या फित्या बांधून रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करीत सरकार विरोधात निदर्शने करून केंद्र सरकारने त्या पीडित महिलांना आणि मणिपूर येथील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी करीत नायब तहसीलदारला सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
कामठी महिला संघाच्या वतीने मणिपूर घटनेच्या निषेधार्थ जयस्तंभ चौक ते तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आले.या मोर्च्याचा शुभारंभ जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आले.तर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार ला सामूहिक निवेदन देऊन मोर्च्याचे समापण करण्यात आले.