नागपूर :- वाल्मीकी रामायण या महाकाव्याव्दारे प्रभू रामचंद्राचे जीवनचरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून समाजामध्ये आदर्श राज्याची संकल्पना साकारणारे रामायण रचयिता महर्षी वाल्मीकी यांच्या जयंती निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील महर्षी वाल्मीकी यांच्या तैलचित्राला अति. आयुक्त अजय चारठाणकर यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी उपायुक्त विजया बनकर, उपायुक्त गजेंद्र महल्ले, अधिक्षक राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, प्रमोद हिवसे, अमोल तपासे, शैलेश जांभुळकर तसेच वाल्मीकी महासभेचे मोतीलाल जनवारे, प्रकाश चमके, शशी सारवान, राजा मस्ते, दुर्गेश खरे, राजेश हातिबेड, अनिल बागडे, अजित जाधव, आदी उपस्थित होते.