नागपूर :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. तसेच संविधान चौक येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाला सुध्दा माल्यार्पण करुन आदारांजली वाहिली.
या वेळी अति. आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपायुक्त निर्भय जैन, रविन्द्र भेलावे, सहा. आयुक्त महेश धामेचा, मुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे, वैद्यकीय आरोग्य अधिकरी नरेन्द्र बहिरवार आदि उपस्थित होते.