विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त डॉ नीलम गोऱ्हे यांचे सुचनेनुसार ९६ वर्षीय ज्येष्ठ माजी सदस्य ॲड. गोविंदराव आठवले यांचा सत्कार

नागपूर :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे ९६ वर्षीय ज्येष्ठ माजी सदस्य ॲड. गोविंदराव आठवले यांचा बुधवारी २० डिसेंबर रोजी उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने हृद्य सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र विधानपरिषदेला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने ८ नोव्हेंबर २०२३ आणि ८ डिसेंबर २०२३ रोजी अनुक्रमे मुंबई आणि नागपूर येथे समारंभ झाला. या समारंभामध्ये अनेक ज्येष्ठ माजी विधान परीषद सदस्य व ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत मुंबई व नागपूर येथे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांना वयोमानामुळे ॲड. गोविंदराव आठवले उपस्थित राहू शकले नाहीत. वृद्धापकाळामुळे त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढाकार घेतला.

उपसभापतींच्या सूचनेनुसार त्यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, उपसभापतींचे विशेष कार्य अधिकारी डॉ संतोष उडतेवार यांनी ॲड. गोविंदराव आठवले यांच्या निवासस्थानी भेट देवून शाल, विधिमंडळाचे गौरवचिन्ह, विधान मंडळातर्फे प्रकाशित राजर्षी छत्रपती शाहू महाराज ग्रंथाची प्रत आणि पुष्पगुच्छ देत सत्कार केला. या हृद्द कार्यक्रमावेळी ॲड. आठवले यांचे पुतणे अतुल आठवले आणि कुटुंबिय तसेच ॲड. आठवले यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक उपस्थित होते.

सन १९७२ ते १९७८ दरम्यान ॲड.आठवले यांनी विदर्भ पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व केले. वयाच्या ९६व्या वर्षी देखील ॲड.आठवले यांची स्मरणशक्ती आणि वाणी तीक्ष्ण असून त्यांनी या सत्कारप्रसंगी आपल्या कार्यकाळात घडलेले विधानपरिषदेतील अनेक महत्वाचे प्रसंग, आठवणींना उजाळा देत सत्काराबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच डॉ नीलम गोऱ्हे यांच्या बद्दल कृतज्ञभाव व्यक्त करत त्यांना दत्तोपंत ठेंगडी यांचे चरित्र भेट स्वरुपात दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा अहवाल

Thu Dec 21 , 2023
– महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (मऔविम) भूमिकेवर कामगिरी लेखापरीक्षण महाराष्ट्र शासन वर्ष 2023 चा अहवाल क्र 5 नवी दिल्ली :-महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 च्या कलम 3 अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना (ऑगस्ट 1962 ) महाराष्ट्र राज्यातील उद्योगांची जलद आणि सुव्यवस्थित स्थापना, वाढ आणि विकास याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी केली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!