नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक समरसतेचे दिपस्तंभ, थोर समाजसुधारक, कर्मयोगी, समस्त समाजाला किर्तनाच्या माध्यमातुन स्वच्छतेचा संदेश देणारे व्रतस्थ संत श्री गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती निमित्त आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी संत श्री गाडगेबाबा महाराज यांचे प्रतिमेला पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी अति.आयुक्त राम जोशी, उपायुक्त रविंद्र भेलावे, उपायुक्त प्रकाश वराडे, उपायुक्त गजेंद्र महल्ले, तंत्रज्ञान संचालक महेश धामेचा, अधिक्षक अभियंता मनोज तालेवार, उद्यान अधिक्षक अमोल चौरपगार, सहा.जनसंपर्क अधिकारी अमोल तपासे, प्रकाश खानझोडे, विनोद डोंगरे, शैलेष जांभुळकर, राजु मेश्राम इतर कर्मचारी उपस्थित होते.