संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-कामठी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्र येथे स्वातंत्रता दिना निमित्त ध्वजारोहण
कामठी :- दरवर्षी स्वतंत्रता दिना निमित्त मोठ्या संख्येने लोकं कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देत असतात त्या निमित्ताने ड्रॅगन पॅलेस टेम्पलला रंगीबेरंगी रोषणाईची सजावट करण्यात आलेली आहे त्याच प्रमाणे ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्र ड्रॅगन पॅलेस मेडिटेशन सेंटरला सुद्धा स्वातंत्र्य दीना निमीत्त रोषणाई करण्यात आली आहे.तसेच कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या स्मूर्तीस्थळा समोर व ड्रॅगन पॅलेस कडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर असलेल्या विद्दूत खांबावर तिरंगा रंगाची रोषणाई करण्यात आली आहे अशा पद्धतीने संपूर्ण ड्रॅगन पॅलेस परिसर हा तिरंगांनी न्हाऊन निघाला आहे.
स्वतंत्रता दिना निमित्त 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्रामध्ये विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण होणार आहे. याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र ,ड्रॅगन पॅलेस टेम्पल ,हरदास एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी ,दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र ,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल ,हरदास विद्यालय इत्यादी संस्थेचे पदाधिकारी ,शिक्षकगण व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.