धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथील मनपा नियंत्रण कक्षाचे आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण

अनुयायांना असुविधा होऊ न देण्याचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांचे अधिकाऱ्यांना निर्देश : मनपा प्रशासन पूर्णतः सज्ज

नागपूर :-  देशभरातून लाखो अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर येतात. अनुयायांना कसल्याही प्रकारची असुविधा होऊ नये याकरिता नागपूर महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी मनपातर्फे साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ मनपा नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. या कक्षाच्या लोकार्पण प्रसंगी सर्वश्री मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपयुक्त(महसूल) मिलिंद मेश्राम, उपायुक्त (घनकचरा व्‍यवस्थापन) डॉ. गजेंद्र महल्ले, सहाय्यक आयुक्त किरण बगडे, अतिरिक्त सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, यांच्यासह सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपद्रव शोध पथकाचे जवान, मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांना मनपातर्फे योग्य सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले. दीक्षाभूमी व संपूर्ण परिसरात स्वच्छता कायम राहावी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करुन नागरिकांना कोणतीही असुविधा होऊ नये याबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचना ही आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिल्या. याप्रसंगी उपयुक्त(महसूल) मिलिंद मेश्राम यांनी नागपूर महानगरपालिकेद्वारा करण्यात आलेली व्यवस्थेची माहिती दिली. तसेच मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी परिसराची पाहणी केली. 

मनपा प्रशासन पूर्णतः सज्ज 

उपयुक्त(महसूल) मिलिंद मेश्राम यांनी सांगितले की, नागपूर महानगरपालिकेचे नियंत्रण कक्ष पुढील तीन दिवस २४ तास कार्यरत असणार आहे, यात घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे दीक्षाभूमी परिसराच्या चारही बाजूच्या रस्त्यांची साफसफाई करण्यात येणार आहे. त्याकरिता प्रत्येक पाळीत २० कर्मचारी तैनात असणार आहेत. रस्त्यावर पडलेला कचरा, साफसफाईतील कचरा चारही रस्त्यावर असलेल्या २०० ड्रममध्ये साठवून, ड्रम मधील कचरा Pick up करण्यात करीता २० लहान वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. लहान वाहनातील कचरा मोठ्या दोन कॉम्पॅक्टरमध्ये घेवून भडिवाडीत पोहोचविण्यात येणार आहे. परिसरात सी.सी.टीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहे. जलप्रदाय विभागातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे सार्वजनिक भोजनदान स्थळी असलेल्या पिण्याच्या पाण्याचे ड्रम टँकरच्या माध्यमातून पाणी भरून ठेवण्यात आले आहे. तसेच रहाटे कॉलनी चौक ते लक्ष्मीनगर चौक -४० नळ, दिक्षाभूमी चौक ते काछीपुरा चौक ५० नळ, आय.टी. आय . परिसरात ४० नळ लावण्यात आले आहेत. आकस्मिक प्रसंगी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता म.न.पा. शाळेत विद्युत दिव्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

९०० शौचालयांची व्यवस्था 

महानगर पालिकेद्वारे ९ ०० शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात माता कचेरी परिसरात १२० संडास सीट, आय.टी. आय. परिसरात ३२० शौचालय, मध्यवर्ती कारागृहाच्या जागेत ३३० शौचालय, क्षाभूमी परिसरात ७८ शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ९०० शौचालय परिसरात सुगंधीत जंतूनाशक फवारणी करण्यात येणार आहे. याशिवाय नीरी रोड, काछीपुरा चौक, रहाटे कॉलनी चौक, लक्ष्मीनगर चौक मोबाईल टॉयलेट तयार करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

Tue Oct 4 , 2022
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.3) 02 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com