संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर 27 नोव्हेंबर सोमवार ला विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस परिसरात 15 हजार स्कवेअर फिट असलेल्या भव्य दिव्य असलेल्या अप्रतिम ‘फूड कोर्ट ‘चे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.याप्रसंगी केंद्रिय रस्ते व वाहतूक व सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी ,आमदार टेकचंद सावरकर, ओगावा सोसायटी च्या अध्यक्षा व ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे, जपान हुन आलेले वंदनीय पुज्यनिय भदंत निचियु (कानसेंन )मोचीदा,पुज्यनिय भिक्खू संघा सह फूड कोर्ट चे आर्किटेक्चर डीझाईन सुप्रसिद्ध आर्किटिस्ट हबीब खान ,स्ट्रक्चरल डिझाईनर दिलीप मसे प्रामुख्याने उपस्थिती होते.
या ‘फूड कोर्ट’ उदघाटन कार्यक्रमच्या प्रस्ताविकेत माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी सांगितले की उदघाटीत करण्यात आलेले अप्रतिम ‘फूड कोर्ट’हे ड्रॅगन पॅलेस परिसरात 15 हजार स्कवेअर फूट परिसरात उभारण्यात आलेले असून हे ‘फूड कोर्ट’ राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अर्थसहाय्यातून निर्मिती करण्यात आली आहे. या फूड कोर्ट चे अप्रतिम आर्किटेक्चर डिझाईन सुप्रसिद्ध आर्किटिस्ट हबीब खान यांनी केले असून स्ट्रक्चरल डिझाईन दिलीप मसे यांनी केले आहे.या फूड कोर्टच्या बांधकामाकरिता दिवसरात्र अहोरात्र मेहनत घेण्यात आली असून 15 हुन अधिक एजन्सी ने आपले योगदान दिले आहे.या फूड कोर्ट च्या माध्यमातुन विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देणाऱ्या लाखो भाविकांना विविध व्यंजनाचा आस्वाद घेता येणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत धम्मसेवक धम्मसेविकागण उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी केले तर आभार नागपूर महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका वंदना भगत यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ड्रॅगन पॅलेस ओगावा सोसायटी,हरदास विद्यालय ,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल ,हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था,डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्र ,दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र व ईतर सामाजिक संस्थेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.