अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया :- जिल्हातिल तिरोडा तालुक्यातील धादरी/उमरी गावात गट ग्रामपंचायत कार्यालय धादरी येथे संविधान दिना निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रा समोर दिप प्रज्वलन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली व २६नोव्हेंबर २००८रोजी झालेल्या दहसतवादी हल्यामध्ये मुर्त्यू मुखी पडलेल्या निष्पाप नागरिक व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली व संविधान उदेशिकेचे वाचन करण्यात आले या नंतर या दिनाचे औचित्य साधून धादरी उमरी गावाच्या मधातून वाहत असलेल्या नाल्यावर गट ग्रामपंचायत, तालुका कृषी अधिकारी तिरोडा, पूर्व माध्यमिक शाळा धादरी, पूर्व प्राथमिक शाळा उमरी, श्रम शक्ती समिती व गावातील होतकरू जागृत तरुण मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आलेला आहे.
या सर्व उपक्रमांत सरपंच अजितकुमार ठवरे, कृषि सहायक रुपेश रिणाईत, ग्रामसेवक ढोके, तंटामुक्ति समितीचे अध्यक्ष घनश्याम रहांगडाले, पो. पा.उके, शाळा समितीचे अध्यक्ष रेखलाल पटले, सुनिल पटले सदस्य ग्रा. प., अमिताभ चौरे सदस्य ग्रां. प.,माया अनकर सदस्या ग्रा. प., सर्व पवन पटले, संतोष लिल्हारे, दिपक नागपुरे, डॉ.पटले, डॉ. रहांगडाले, सुखदास अनकर, प्रेमलाल पटले,झनकलाल पटले, मनोहर रहांगडाले, नंदलाल कटरे, संतोष भगत, प्रमोद उके,
सतिश गणेश पटले, नरेश अनकर , संदिप उके, रविंद्र रहांगडाले, मुन्ना पटले, रविदास तुमसरे, शरद कापसे, एम. एम. पटले (मुख्याध्यापक), भोयर(मुख्याध्यापक), ठाकरे, बघेले, मेश्राम, बोपचे, सोनेकर, दिपीका पटले, वैद्य (मदतनीस), सुरेश नागपुरे (संगणक परिचालक), कविदास तुमसरे (परिचर), सचिन ठाकरे उभी (रोजगार सेवक), शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी या सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य केले.