– मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे ना.सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
चंद्रपूर :- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ शनिवारी ०६ एप्रिल २०२४ रोजी राजुरा येथे सकाळी १०.०० वाजता व पांढकवडा (जि. यवतमाळ) येथे दुपारी १.०० वाजता केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे.
केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या जाहिर सभेला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
देशभर रस्ते आणि पुलांचे जाळे निर्माण करून पायाभूत सुविधांना उभारी देणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पालकमंत्री म्हणून मा. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र विकास कामांचा तसेच अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांचा धडाका लावून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला आहे. प्रचार दौरे आणि सभांमधून त्यांच्या कामावर नागरीकही समाधान व्यक्त करून समर्थन देत आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळावी तसेच जिल्ह्यात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास यावेत, याकरिता विकासाला अर्थात सुधीर मुनगंटीवार यांना साथ देण्याचे आवाहन समर्थकांकडून करण्यात येत आहे.