– सकाळी नऊ पासून होणार नोंदणी
– मोठ्या संख्येने वसंतराव देशपांडे हॉलमध्ये येण्याचे आवाहन
नागपूर :- मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या अंतर्गत अल्पसंख्याक समाजातील गरजू लाभार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा व कर्ज योजनेचा शुभारंभ सोमवार 18 डिसेंबर रोजी होत आहे. सकाळी नऊ वाजता पासून विविध कर्ज योजनेसाठी नोंदणी सुरू होणार आहे. नागरिकांनी लाभ घेण्याच्या आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुस्लिम, बौद्ध, शीख, पारसी, ख्रिश्चन, जैन व ज्यू समाजातील सर्व अल्पसंख्यांक गरजू व गरीब लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचा शुभारंभ नागपूर येथील डॉ.वसंतराव देशपांडे हॉल सिव्हिल लाईन परिसरात होणार आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित राहणार आहेत.
नागपूर येथील कार्यक्रमांमध्ये डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना, उन्नती मुदत कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना, मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेचा शुभारंभ होत आहे. यासाठी सकाळी नऊ वाजता पासून नोंदणी सुरू होणार आहे, अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांनी सकाळीच नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्य कार्यक्रम दुपारी दोन वाजता होणार असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाने केले आहे. या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी राज्य शासनाच्या वेबसाईटवर भेट देण्याच्या आवाहनही त्यांनी केले आहे.