रामटेक – ७५ वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने आनंदधाम रामटेकच्या वतीने व्यसनमुक्ती अभियानाअंतर्गत स्वच्छता अभियान ५१ गावामध्ये राबविण्यात येत आहे. आमडीच्या पटगोवारी व आसडी या गावामध्ये ४५ गावामध्ये दिवस पर्यंत स्वच्छ
करून स्वतःचे घर स्वच्छ ठेवा परिसर स्वच्छ सुंदर ठेवा स्वतःचे आरोग्य उत्तम देव असा संदेश देण्याचे कार्य आनंदधाम रामटेकच्या गोल्डन ग्रूप सेवकांची आमडी येथील सेवकासह जनतेला देऊन जागृत करणे व्यसन मुक्त होऊन सुखी समाधानी जीवन जगण्यारा सेवकांनी स्वच्छता अभियान राबवून जनतेला स्वच्छतेचा संदेश देण्याचे महान कार्य केल्यामुळे त्याप्रित्यर्थ ग्रामस्वच्छता अभियानाचा समारोप कार्यक्रम आमडी ग्राम व आनंदधाम रामटेकच्या संयुक्त विद्यमाने आमडी येथे साजरा करण्यात आला. या समारोप कार्यक्रमाला रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कुपालजी तुमाने रामटेक विधानसभेचे आमदार आशिषजी जैस्वाल यानी प्रकर्षाने उपस्थिती दर्शवून स्वच्छतेचे महत्व अनेक मुद्द्यासह समजवून सांगितले.सरपंच शुभागीताई राजुजी भोसकर, आमडी गटनेता राजुजी भोसकर व इतर मान्यवरांनी जनतेला संबोधित केले.
ग्रामस्वच्छता अभियान राबवितांना शासनाने निर्देशित केलेल्या नियमाचे काटेकोर पालन करून कार्यक्रमाचे आयोजन केले व संपूर्ण आमची ग्राम स्वच्छ सुंदर केल्यामुळे लक्ष्मणराव मेहर (बाबूजी) आनंदधाम रामटेक यांनी स्वच्छतेचे सत्कार्य केल्यामुळे खासदार कृपाल तुमाने व आमदार आशीष जैस्वाल यांनी मेहर बाबूजीना सम्मान पत्र देऊन त्यांचा गौरव आमडी ग्रामपंचायतच्या वतीने
करण्यात आला.
व्यसनमुक्ती अभियान स्वच्छता अभियान यासारखे कार्य करणारे महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसन मुक्ती सेवा पुरस्कृत व ब्रॅन्ड अॅबेसेडर रामटेक लक्ष्मणराव मेहर (बाबूजी) आनंदधाम रामटेकचे संस्थापक यांनी स्वच्छता अभियानाच्या प्रत्येक मुद्द्यावर विस्तुतपने माहिती देऊन व्यसन मुक्तीचा जनतेला संदेश अध्यक्षपदावरून दिला. व्यसनमुक्ती अभियान व स्वच्छता अभियान कार्यक्रम आयोजन आमडी येथील गणेशजी केळवदे मार्गदर्शक आमडी राजेश केळवदे सुरजुसे फत्तू कारामोरे, प्रभुनाथ कोयपरे इतर अनेक परमात्मा एक चा सेवकांनी पार पाडले. समारोप कार्यक्रमाला गट ग्राम पं आमडी येथील सरपंच सौ. शुभांगीताई भौसकर यांनीही स्वच्छतेचे प्रदर्शन करून रस्त्याचे सुशोभिकरण केले.
आनंदधाम रामटेक अंतर्गत मनोहरजी हिंगे मार्गदर्शक हिवरा यांनी ४५ दिवस पर्यत आमडी येथे जाऊन सेवकांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची सुंदर व नियमितपणे समजावून सांगितले या स्वच्छता अभियान समारोप कार्यक्रमाचे संचालन सीमाताई नागपुरे, यांनी केले . राजुजी भोसकर यांनी आभार प्रदर्शन केले.