-धावत्या रेल्वेत बसण्याचा प्रयत्नात ती रक्तबंबाळ
– नागपुरला येणार्या दक्षिण एक्सप्रेसमधील थरार
– गाडीला तासभर उशिर
नागपूर :-धावत्या रेल्वेत बसण्याच्या प्रयत्नात एक वृध्द महिला रेल्वेगाडी आणि प्लॅटफार्मच्या मधातील गॅपमध्ये फसली. कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानांनी तिला बाहेर काढून उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील आमला रेल्वे स्थानकावर दक्षिण एक्सप्रेसमध्ये घडली. बुधनी पटेल (70) असे त्या वृध्द महिलेचे नाव आहे.
बुधनी, तिचे कुटुंबिय आणि गावकर्यांसह बैतुलला रामपाल महाराज यांचे प्रवचन ऐकण्यासाठी गेले होते. प्रवचन संपल्यानंतर परत गावी जाण्यासाठी सर्व जण 12722 दक्षिण एक्सप्रेसने नागपुरसाठी निघाले. यावेळी बहुतांश गावकरी आणि नातेवाईक जनरल कोचमध्ये बसले. मात्र, जागेअभावी बुधनी आणि तिची मुलगी स्लीपर कोचमध्ये बसली.
आमला रेल्वे स्थानक आल्यानंतर त्यांनी गावकर्यांसह जनरल डब्यात बसण्याचा निर्णय घेतला. मायलेकी स्लीपरमधून उतरून जनरल कोचमध्ये बसण्यासाठी जात असतानाच गाडी सुटली. मात्र, बुथनीची मुलगी धावत्या गाडीच बसली. बुधनीनेही धावत्या गाडीत बसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा हात निसटल्याने ती रेल्वेगाडी आणि प्लॅटफार्मच्या मधातील गॅपमध्ये फसली. आरडा ओरड होताच कर्तव्यावर असलेले उप निरीक्षक शिवरामसिंह यांनी गाडी थांबविली. तसेच एस.एन.यादव, आरक्षक हरमुख गुर्जर यांना बोलावून प्रवाशांच्या मदतीने फसलेल्या वृध्द महिलेला बाहेर काढले. तिच्या पाय रक्तबंबाळ झाला होता. रूग्णवाहिका बोलाविली. मात्र बराच वेळ होवूनही रूग्णवाहिका न आल्याने शिवराम सिंह, यादव यांनी ऑटोरीक्षात घालून तिला रूग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे गाडीला एक तास उशिर झाला.
@ फाईल फोटो