जयस्तंभ चौकातील बस स्टॉप मध्ये इसमाची गळफास लावून आत्महत्या..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 5 – स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयस्तंभ चौक बस स्थानक मध्ये एका 70 वर्षीय इसमाने कापडी दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री साडे अकरा दरम्यान निदर्शनास आल्याने सर्वत्र खळबळ माजली मृतक इसमाचे नाव तुकाराम नागो कोकाटे रा रमानगर कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले .आत्महत्येचे कारण कळू शकले नसले तरी भर महामार्गच्या कडेला असलेल्या बस स्थानक मध्ये गळफास लावल्याची घटना ही सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून ही हत्या की आत्महत्या याबाबत शंका कुशंका व्यक्त करण्यात येत आहे.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सदृढ लोकशाही निर्माण करण्याचे दायित्व वकिली व्यवसायाकडे - सरन्यायाधीश उदय लळीत

Mon Sep 5 , 2022
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सरन्यायाधीशांचा हृद्य सत्कार   नागपूर ४ : मनुष्याने केलेली कुठलीही कृती, वागणूक यासंदर्भात न्याय देण्याची शक्ती समाजाने न्यायाधीशांना प्रदान केली आहे. या शक्तीच्या भरवश्यावर न्यायाधीश कायद्याच्या अंमलबजावणीतून सदृढ लोकशाहीचे निर्माण करु शकतात. त्यामुळे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी न्यायिक क्षेत्राला प्रबळ व्यवसाय म्हणून पहावे, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आज येथे केले. वारंगास्थित महाराष्ट्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com